कन्‍यादान योजना (मावक व विजाभज)

 

  • शासन निर्णय :-
  • शासन निर्णय सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक २४ डिसेंबर २००३
  • शासन निर्णय सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक १८ डिसेंबर २००८
  • शासन निर्णय सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक १५ ऑक्‍टोबर २०१६
  • शासन निर्णय विजाभज व विमाप्र (प्रशासकीय मान्‍यता) दिनांक ०२ फेब्रुवारी २०१९

 

  • उद्दिष्‍टे :-

समाजातील मागासवर्गीयांचे विवाह वाढत्‍या महागाईत कमी खर्चात व्‍हावे व मागासवर्गीय कुटूंबांचा विवाहावर होणा-या अनाठाई खर्चावर नियंत्रण रहावे यासाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणा-या स्‍वयंसेवी संस्‍थांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सदर योजना महाराष्‍ट्र शासनाने सुरु केली आहे.

  • कन्‍यादान या योजनेचे पात्रता व निकष :-
  • वधु व वर महाराष्‍ट्रातील रहिवासी असावेत
  • नवदांपत्‍यातील वधु/वर यापैकी दोन्‍ही किवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौध्‍दासह) असावा, विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  • दांपत्‍यापैकी वराचे वय २१ वर्ष व वधुचे वय १८ वर्षापेक्षा कमी असू नये.
  • वधु-वर यांच्‍या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय असेल.
  • बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्‍या कोणत्‍याही कलमाचा भंगया दाम्‍पत्‍या/कुटूंब यांचेकडुन झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर कराणे आवश्‍यक आहे.
  • जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले असावे.
  • आंतरजातीय विवाह असल्‍यास त्‍यासाठी शासन निर्णय क्र. युटीए-१०९९/प्र.क्र.४५/मावक-२, दिनांक ३० जानेवारी १९९९ नुसार जे फायदे मिळतात तेही फायदे अनुज्ञेय राहतील.
  • सामुहिक विवाह आयोजित करणा-या स्‍वयंसेवी संस्‍था/यंत्रणेचे निकष
  • स्‍वयंसेवी संस्‍था/ यंत्रणा संस्‍था नोंदणी अधिनियम १९६० व सार्वजनिक विश्‍वस्‍त अधिनियम १८५० अंतर्गत नोंदणीकृत असावी.
  • सामुहिक विवाहासाठी कार्य करणारी स्‍वयंसेवी संस्‍था/यंत्रणा सेवाभावी असावी, व्‍यावसायिक नसावी.
  • सेवाभावी संस्‍था/ यंत्रणेने आयोजित केलेल्‍या सामुहिक विवाह सोहळयामध्‍ये केला जाणारा खर्च हा संस्थेने करावा. त्‍यासाठी संस्‍था पुरस्‍कर्ते शोधु शकेल. मात्र अशा कार्यक्रमासाठी कोणत्‍याही शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
  • सामूहिक विवाह सोहळयासाठी किमान १० दाम्‍पत्‍ये (२० वर व वधु) असणे आवश्‍यक आहे.
  • सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्‍यासाठी क्षेत्रबंधन लागू होणार नाही.
  • लाभाचे स्‍वरुप :-
  • महाराष्‍ट्रात अनुसूचित जाती (नवबौध्‍दासह) विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्‍ट्या कमकुवत असलेल्‍या मागासवर्गीय कुटूंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्‍ये सहभागी होऊन विवाह करणा-या जोडप्‍यांना रु. २००००/- हजार इतके अर्थसहाय्य वधुचे आई-वडील किंवा पालकांच्‍या नावे मंजूर करण्‍यात येते.
  • सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणा-या संस्‍था व संघटांना प्रत्‍येकी जोडप्‍यामागे रु. ४०००/- हजार एवढे प्रोत्‍साहनपर अनुदान देण्‍यात येते.