अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटूंबांवर/व्यक्तींवर अत्याचार घडल्यास, सदर गुन्ह्यांची नोंद नागरी, हक्क अधिनियम १९५५ खाली/ अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ खाली झाली असल्यास गुन्ह्यांच्या स्वरुपावरुन रु. ६० हजार ते रु. ८.२५ लाखापर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते.
समित्या :-
जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती
उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती
समित्यांचे कार्य
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ ची अंमलबजावणी जिल्ह्यात योग्य रितीने व काटेकोरपणे होते किंवा कसे याचा आढावा घेणे तसेच या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.
सदर अधिनियम अंतर्गत अत्याचार पिडीतांना अर्थसहाय्य नियमानुसार देण्यात येते किंवा कसे या बाबतचा आढावा घेणे.
सदर अधिनियम अंतर्गत दाखल झालेल्या व पोलीस तपासावर असलेल्या प्रकरणांचा आढावा घेणे.
या अधिनियमाची कोटेकोरपणे अंमलबजावणी संबंधीत संस्था/अधिकारी/कार्यालयाकडुन होते आहे किंवा कसे या बाबतचा अढावा घेणे.
या अधिनियमांतर्गत नियमांचे उल्लंघन अथवा अंमलबजावणी संबंधी शासनास प्राप्त होणा-या विविध अहवालांचा प्रकरणांचा आढावा घेणे