अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना
उदिष्ट:- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतक-यांना 100 % अनुदानावर पावर टीलरचा पुरवठा करण्याची योजना बंद करण्यात येवून त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना 90% अनुदानावर 9 ते 18 अश्व शक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.
स्वरूप:-अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे
रहिवाशी असावेत.
स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील
असावेत.
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु 3.15 लाख ( अक्षरी रुपये तीन
लाख पन्नस हजार फक्त ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
ठरवून दिलेल्या उदिष्टांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लाटरी पद्धतीने
करण्यात येईल.
लाभाचे स्वरूप:- 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||