कन्यादान योजना (मावक व विजाभज)
समाजातील मागासवर्गीयांचे विवाह वाढत्या महागाईत कमी खर्चात व्हावे व मागासवर्गीय कुटूंबांचा विवाहावर होणा-या अनाठाई खर्चावर नियंत्रण रहावे यासाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणा-या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे.