मागासवर्गीय मुलां-मुलींसाठी शासकीय वसतिगृह

उद्दिष्ट :

मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे,यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत. सदरची योजना सन 1922 पासुन कार्यान्वित आहे. सध्या लातूर जिल्ह्यात विभागीय,जिल्हा व तालुका पातळीवर मुलांसाठी 13 तर मुलींसाठी 12 असे एकुण 25 शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत.सदर वसतिगृहामध्ये सन 2019-20 मध्ये एकुण 2711 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

सोयी सुविधा :-

शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.बीसीएच-2010/प्र.क्र.430/मावक-4,

दि.26 जुलै,2011 नुसार खालील प्रमाणे सोयी-सुविधा देण्यात येतात.

  1. शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना भोजनात गहू/बाजरी/ज्वारी/तांदूळ(भात)/दाळ/भाजीपाला/कंदभाजी इत्यादी वस्तूंचा पुरवठा अमर्यादित (पोटभर) करणे.    
  2. नाश्त्यासाठी विद्यार्थ्यांना उसळ/पोहे/उपमा/शिरा यापैकी एक, दुध (साखरेसह), उकडलेली 2 अंडी दररोज व शाकाहारी मुलांसाठी कॉर्नप्लेक्स (सिरीयल), प्रत्येकी दिवशी एक सफरचंद व ऋतुमानाप्रमाणे मिळणारे एक       फळ (शासकीय वसतीगृहासाठी)
  3. मटन/चिकन दर आठवडयाला 500 ग्रॅम प्रतिविद्यार्थी याप्रमाणे आठवडयातून दोनदा, दरवेळी प्रतिविद्यार्थी  

             250 ग्रॅम प्रमाणे भात/पुलाव सलाड सह. (शासकीय वसतीगृहासाठी)

  1. शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वेळी 2 भाजी, वरण व दही, भात व एक गोड पदार्थ (स्वीट) आठवडयातून 2  

             वेळा (शासकीय वसतीगृहासाठी)

  1. दररोज प्रत्येक जेवणात आवश्यक तेवढे कांदा, लिंबू, लोणचे, पापड, सलाड व 50 ग्रॅम गावरान तुन (दर आठवडयात) (शासकीय वसतीगृहासाठी)
  2. निर्वाह भत्ता-

      विभागीयस्तर दरमहा रु.800/- प्रत्येकी,

      जिल्हास्तर दरमहा रु.600/- प्रत्येकी,

      तालुकास्तर दरमहा रु.500/- प्रत्येकी (शासकीय वसतीगृहासाठी)

  1. मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी अतिरिक्त रु.100/- दरमहा (शासकीय वसतीगृहासाठी)
  2. शालेय गणवेश रु.500/- प्रमाणे प्रत्येकी 2 जोड दरवर्षी (शासकीय वसतीगृहासाठी)
  3. महाविद्यालयीन स्तर जेथे ड्रेस काड असेल तेथे प्रति विद्यार्थी रु.1000/- प्रमाणे 2 जोड (शासकीय वसतीगृहासाठी)
  4. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ॲप्रनसाठी रु.500/- प्रती विद्यार्थी दरवर्षी (शासकीय वसतीगृहासाठी)
  5. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर लगेचच वैद्यकीय साहित्यासाठी रु.1000/- प्रति विद्यार्थी देण्यात यावेत. वैद्यकीय शाखेसाठी स्टेथोस्कोपसाठी रु.1000/- व इतर साहित्यासाठी रु.1000/- असे     एकूण रु.2000/- प्रति विद्यार्थी दरवर्षी (शासकीय वसतीगृहासाठी)
  6. आभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी बॉयलर सुटसाठी प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी रु.500/- (शासकीय वसतीगृहासाठी)
  7. आभियांत्रिकी पदवी/पदविकाच्या ड्रॉईंग बोर्ड व इतर साहित्यासाठी प्रति विद्यार्थी रु.2500/- दरवर्षी (शासकीय वसतीगृहासाठी)
  8. लॅब ॲप्रनसाठी रु.500/- प्रतिविद्यार्थी दरवर्षी (शासकीय वसतीगृहासाठी)
  9. शारिरीक शिक्षण महाविद्यालय 2 गणवेशासाठी रु.4000/- प्रति विद्यार्थी दरवर्षी (शासकीय वसतीगृहासाठी)
  10. छत्री/रेनकोट व गमबूट दरवर्षी दरवर्षी रु.500/- प्रमाणे प्रति विद्यार्थी (शासकीय वसतीगृहासाठी)

 

  1. कला शाखेतील चित्रकला, संगीत व इतर पदवी/पदविका तसेच विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी       

             आवश्यक असलेले साहित्यासाठी रु.4000/- दरवर्षी प्रति विद्यार्थी (शासकीय     वसतीगृहासाठी)

  1. शैक्षणिक सहलीसाठी प्रत्येकी रु.2000/- दरवर्षी प्रति विद्यार्थी (शासकीय वसतीगृहासाठी)
  2. शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी कार्यशाळेकरिता रु.500/- प्रति विद्यार्थी प्रतीवर्ष
  3. प्रोजेक्ट रिपोर्टसाठी प्रति विद्यार्थी रु.1000/- प्रती प्रकल्प (शासकीय वसतीगृहासाठी)
  4. स्नेहसंम्मेलन / करमणुक व्यवस्थेसाठी प्रति शासकीय वसतिगृह रु.25000/- दरवर्षी (साऊंड सिस्टीम साहित्य  

            व इतर खर्चासाठी)

  1. क्रीडा वस्तु खरेदीसाठी प्रति शासकीय वसतीगृह रु.10000/- दरवर्षी
  2. प्रत्येक शासकीय वसतीगृहासाठी एक कलर टी.व्ही. 40 ते 50 इंची स्क्रीनचा. तसेच वैज्ञानिक अथवा  

            संशाधनात्मक चॅनल करिता डिश ॲन्टीना व पेड चॅनल करिता रु.10000/- प्रति वर्ष प्रति वसतीगृह           

  1. प्रत्येक शासकीय वसतीगृहासाठी ॲक्वॉगार्ड व वॉटर कुलर
  2. प्रत्येक शासकीय वसतीगृहात फायर फायटींग सुविधा
  3. शासकीय वसतीगृहामध्ये 10 विद्यार्थ्यांसाठी एक संगणक,इंटरनेट सुविधेसह उपलब्ध करुन देणे. तसेच एका वसतीगृहासाठी एक प्रिंटर
  4. सर्व शासकीय वसतीगृहामध्ये अद्ययावत ग्रंथालय, त्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच ग्रंथालयामध्ये एल.सी.डी., संगणक इंटरनेटसह, आवश्यक सर्व प्रकारचे     फर्नीचर व ई-लायब्ररीच्या सर्व सुविधा तसेच 5 वर्तमान पत्रे       (इंग्रजी व मराठी) आणि 10    शिक्षण उपयोगी मासिके त्यामध्ये प्रामुख्याने सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा,       मार्गदर्शन, चालू घडामोडी      बाबत अंक इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेतील करणे.
  5. वर्षातून दोनदा पालक सभा आयोजित करणे. (रु.10000/- प्रति सभा खर्च)
  6. शासकीय वसतिगृहातील सर्व मुला/मुलींना 10 दिवसांच्या विपश्यना प्रशिक्षणाकरिता योग्य वेळेनुसार सोईच्या  

             ठिकाणी पाठविण्यात यावे. यासाठी होणारा खर्च मंजूर तरतुदीतून करणे.

प्रवेश प्रक्रिया :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये एकुण 25 वसतिगृहे कार्यरत असुन सदर वसतिगृहाची प्रवेशासाठी  विद्यार्थ्यांनी त्यांचे शाळा/ महाविद्यालयाच्या नजिकच्या वसतिगृहामध्ये खालील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष अर्ज करणे आवश्यक.

प्रवेशासाठी अटी व शर्ती :

  1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
  2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  3. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु.2,00,000/- पेक्षा जास्त नसावे.
  4. इयत्ता 8 वी व त्यापुढे माहाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
  5. अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 30 जून पर्यत किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत.
  6. सन 2014-15 पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहाच्या जागेपैकी 10 % प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणुन अटी व शर्तीस अनुसरूण गुणवत्तेनुसार भरण्यात येतात आणि 5 % खासबाब म्हणुन अनाथ तसेच मांग,भंगी,मेहतर या जातीतील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.

प्रवेशासाठी संपर्क :

  1. संबंधित गृहप्रमुख/गृहपाल,मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह.
  2. संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
  3. संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण.

 

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

1000 मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह अतिरिक्त एम.आय.डी.सी. युनिट क्र.1, मांजरा कारखाना गेट,खंडापूर रोड लातूर

Email Id

unit1latur@gmail.cm

गृहप्रमुख यांचे नाव

श्री. भोजने टी.बी. (अतिरिक्त कार्यभार)

गृहप्रमुख यांचे दुरध्वनी क्रमांक

9637471741

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

250

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

250

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.375809

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.481328

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

1000 मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह अतिरिक्त एम.आय.डी.सी. युनिट क्र.2, मांजरा कारखाना गेट,खंडापूर रोड लातूर

गृहप्रमुख यांचे नाव

श्री. जाधव आर.डी. (अतिरिक्त कार्यभार)

गृहप्रमुख यांचे दुरध्वनी क्रमांक

9764813010

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

250

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

250

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.375809

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.481328

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

1000 मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह अतिरिक्त एम.आय.डी.सी.  युनिट क्र.3, मांजरा कारखाना गेट,खंडापूर रोड लातूर

गृहप्रमुख यांचे नाव

श्री. भुसे वाय.बी. (अतिरिक्त कार्यभार)

गृहप्रमुख यांचे दुरध्वनी क्रमांक

9421576281

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

250

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

250

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.376087

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.481669

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

1000 मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह अतिरिक्त एम.आय.डी.सी युनिट क्र.4, मांजरा कारखाना गेट,खंडापूर रोड लातूर

गृहप्रमुख यांचे नाव

श्रीमती. किर्दंत एम.वी. (अतिरिक्त कार्यभार)

गृहप्रमुख यांचे दुरध्वनी क्रमांक

8857989331

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

250

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

250

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.374451

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.481962

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता :

125 वी जयंती मुलींचे शासकीय वसतिगृह अहमदपूर,गुरुकुल को-हाऊसिंग सोसायटी,अहमदपूर ता.अहमदपूर जि. लातूर

Email ID

govtghahmedpur@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्रीमती पुणे जे.बी. (अतिरिक्त कार्यभार)

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

7776811828         

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.696697

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.943008

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

 125 वी जयंती मुलींचे शासकीय वसतिगृह जळकोट, हळद   वाढवणा रोड, सेवालाल चौक, सरकारी दवाखान्याच्या बाजुस जळकोट ता.जळकोट जि.लातूर

Email ID

govtghahmedpur@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्रीमती पुणे जे.बी. (अतिरिक्त कार्यभार)

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

7776811828         

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.62585

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

77.18635

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

125 वी जयंती मुलींचे शासकीय अंबाजोगाई रोड लातूर जि.लातूर

Email Id

lalitamundhe883@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्रीमती घुगे एल.के.

गृहप्रमुख यांचे दुरध्वनी क्रमांक

8275274921              

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.410658

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.571883

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह औसा, याकतपूर रोड औसा ता.औसा जि. लातूर

Email Id

gbhausa.co.in@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्री.भोजने टि.बी.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9637471741              

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

75

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

75

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.243367

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.520048

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,झरी रोड चाकूर ता.चाकूर जि.लातूर

Email id

wardenchakur@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्री.जाधव जी.पी.(अतिरिक्त  कार्यभार)

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9579835543

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

80

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.517446

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.875159

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह देवणी,नेकनाळ रोड देवणी ता.देवणी जि. लातूर

गृहपाल यांचे नाव

श्री.जाधव डी.डी (अति. कार्यभार)

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9049394847            

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.262949

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

77.07444

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (नविन) अहमदपूर, मरशिवणी,नांदेड रोड अहमदपूर ता.अहमदपूर जि.लातूर

Email ID

warden.gbholdapur@gov.in

गृहपाल यांचे नाव

श्री.जाधव जी.पी.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9579835543         

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.735506

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.952849

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निलंगा, कासार शिरशी रोड, आयटीआयच्या पाठीमागे निलंगा ता.निलंगा जि.लातूर

गृहपाल यांचे नाव

श्री.जाधव डी.डी

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9049394847              

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

75

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

60

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.11819

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.763059

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (जुने) अहमदपूर, मरशिवणी,नांदेड रोड अहमदपूर ता.अहमदपूर जि. लातूर

Email ID

warden.gbhnewapur@gov.in

गृहपाल यांचे नाव

श्री.सिरसाठ पी.एन.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

8888223811         

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.735757

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.947202

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (जुने) लातूर, बालाजी मंदीर जवळ,बसवंतपूर,रेल्वे स्टेशन रोड,रिंग रोड लातूर

Email Id

gbholdlatur5660@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्री. भुसे वाय.बी.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9421576281

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

75

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

75

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.421133

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.55239

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,श्रीराम विद्यालय जवळ,पानगाव रोड,रेणापूर ता.रेणापूर जि. लातूर

गृहपाल यांचे नाव

श्री.जाधव आर.डी.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9764813010

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.528958

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.597905

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उदगीर, सोमनाथपूर,उदगीर ता.उदगीर जि. लातूर

Email Id

warden.gbhu@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्री.मिंपुलवाड बी.टी.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9156808558            

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

75

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

75

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.408555

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

77.109015

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अहमदपूर, मिरकले नगर,म.गांधी महाविद्यालय समोर अहमदपूर ता.अहमदपूर जि. लातूर

Email ID

govtghahmedpur@gmail.com

गृहपाल यांचे नाव

पुणे जे.बी.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

7776811828         

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.692425

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.944735

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह औसा याकतपूर रोड औसा ता.औसा जि. लातूर

Email Id

waghmareausa@gail.com

गृहपाल यांचे नाव

श्रीमती वाघमारे के.व्ही.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

8390775680              

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

80

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

80

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.243497

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.519587

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चाकूर,शासकीय विश्रामगृहा जवळ,नांदेड रोड चाकूर ता.चाकूर जि. लातूर

Email id

ghgchakur@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्रीमती चौधरी व्ही.आर.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9545355057

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

75

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

75

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.520136

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.879106

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देवणी,विवेक वर्धीनी शाळे जवळ,निलंगा रोड देवणी ता.देवणी जि. लातूर

Email ID

girlsgovthosteldeoni@gmail.com

गृहपाल यांचे नाव

श्रीमती विहीरे आर.आर (अतिरिक्त कार्यभार)

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9822077990         

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

80

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.259671

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

77.081402

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नविन) लातूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुनी डाल्डा फॅक्ट्री,शिवनेरी गेट समोर लातूर

गृहपाल यांचे नाव

श्रीमती किर्दंत एम.व्ही

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

8857989331

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

80

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.394314

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.582926

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह निलंगा,दापका निम्न तेरणा प्रकल्प,सार्वजनिक विभाग पाठीमागे निलंगा ता.निलंगा जि. लातूर

Email Id

gilsgovthostelnilanga@gmail.com

गृहपाल यांचे नाव

विहीरे आर.आर

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9822077990              

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

75

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

75

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.13166

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.759862

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय  मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) लातूर,रमा-बिग बझारच्या पाठीमागे सावेवाडी लातूर

गृहपाल यांचे नाव

श्रीमती किर्दंत एम.व्ही (अतिरिक्त कार्यभार)

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

8857989331

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

75

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

75

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.400737

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.570208

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह उदगीर,सोमनाथपूर,उदगीर ता.उदगीर जि. लातूर

Email ID

warden.gbhu@gmail.com

गृहपाल यांचे नाव

गज्जलवार जे.जे. (प्रभारी)

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9545355057            

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

60

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

60

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.408948

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

77.108724

Get Direction

शासकीय वसतिगृहाचे नाव व पत्ता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) लातूर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुनी डाल्डा फॅक्ट्री,शिवनेरी गेट समोर लातूर

Email Id

barkul.pawa72@rediffmail.com

गृहपाल यांचे नाव

श्री. बारकुल पी.एल.

गृहपाल यांचे दुरध्वनी क्रमांक

9404328860

शासकीय वसतिगृहाची मान्य विद्यार्थी संख्या

100

शासकीय वसतिगृहाची इमारत क्षमता

100

शासकीय वसतिगृहाचे अक्षांस

18.394019

शासकीय वसतिगृहाचे रेखांश

76.583814

Get Direction