मातोश्री वृद्धाश्रम योजना

शासन निर्णय :-

  1. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण – 1095/के.नं.106/ सुधार – 2, दिनांक 17/11/1995
  2. शासन निर्णय क्रमांक वृद्धाश्रम -2000/प्र.क्र.673/सुधार – 2, दिनांक 10/04/2001
  3. शासन निर्णय दि.6 मार्च 2019

उद्दिष्ट :-

      वृद्धांना वृद्धापकाळात राहण्याची व जेवणाची सोय करणे. वृद्धांना त्यांच्या वृध्दापकाळात चांगल्या प्रकारे    

              घालविता यावा, यासाठी सोयी-सुविधा यांचा फायदा घेण्यात

              प्रोत्साहन देणे, हा मूळ उद्देश आहे.

स्वरूप :-

  1. शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, व क्रिडा विभाग क्रमांक -संकिर्ण-1095 के.नं.160/ सुधार-2 दि.17 नोव्हेंबर 1995 अन्वये प्रत्येक जिल्ह्यात एक “मातोश्री वृध्दाश्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला असून   तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. शैलेश कुमार शर्मा यांचे आदेश दि.21/06/1996 अन्वये श्री विवेकानंद मेडीकल फाऊंडेशन ॲन्ड रिसर्च सेंटर लातूर या संस्थेस वृध्दाश्रम चालविण्याची मान्यता दिलेली आहे. तसेच संस्थेच्या इमारतीसाठी मौजे आर्वी ता. लातूर येथे शासकीय गायरान सर्वे क्रमांक 69 मधील 5 एकर जमीन प्रतिवर्ष नाममात्र भाड्याने 30 वर्षाच्या मुदतीकरीता भाडेपध्दतीने दिलेली आहे.
  2. सध्यस्थितीत मातोश्री वृद्धाश्रम विना अनुदान तत्वावर चालू आहेत.
  3. सदर इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाकडून 50 लक्ष व केंद्र शासनाकडून 5 लक्ष असे एकूण 55 लक्ष निधी सन 1997-98 मध्ये संस्थेस वितरीत करण्यात आला असून इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे.
  4. मातोश्री वृध्दाश्रमाची मान्य संख्या 100 असून सद्यस्थीतीत 52 जेष्ठ नागरिक निवासी आहेत. सदर वृध्दाश्रमात वयवर्ष 60 वर्ष पुर्ण झालेले पुरुष व 55 वर्ष पुर्ण झालेल्या स्त्रिया यांना प्रवेश दिला जातो. तसेच ज्यांचे उत्पन्न 12000/- पेक्षा अधिक आहे अशा जेष्ठ नागरिकांकडून दरमहा 500/- रुपये शुल्क आकारण्यात येतो.
  5. निवासी प्रत्येक वृध्दांना 1 कॉट, 1 सतरंजी, 1 गादी, 2 चादरी व उशी तसेच हिवाळयात ब्लँकेट इत्यादी सुविधा पुरविल्या जातात.
  6. वृध्दाश्रमातील वृध्द व्यक्तींना सकाळी नास्ता व चहा तसेच दुपारी व संध्याकाळी जेवनाची सोय आहे.
  7. वृध्द व्यक्तींसाठी संस्थेच्या आवारात दवाखान्याची सोय असून वृध्दांना तपासण्यासाठी संस्थेकडून एक डॉक्टर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
  8. शासन निर्णय दि.6 मार्च 2019 अन्वये मातोश्री वृध्दाश्रमास अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आलेली असून अद्याप मातोश्री वृध्दाश्रमास अनुदान प्राप्त झालेले नाही.

अ.क्र.
1

जिल्हा
लातूर

वृध्दाश्रमाचा प्रकार
मातोश्री वृध्दाश्रम

वृध्दाश्रम चालविणाऱ्या संस्थेचे नाव व पत्ता
विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राव्दारे संचलित, लातूर

वृदधाश्रमाचे नाव व पत्ता
मातोश्री वृध्दाश्रम ,मु.पो. आर्वी ता. लातूर जि. लातूर

वृध्दाश्रमास मान्यता दिलेला क्रमांक व दिनांक
समाज कल्याण , सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग-शासन निर्णय क्र. संकीर्ण-1095 /के.नं160 /सुधार -2 मंत्रालय मुंबई दि.17 नोव्हेंबर 1995

वृध्दाश्रमाची मान्य संख्या
100

सन 2021-22 मधील प्रवेशित संख्या
55

प्राप्त तरतुद (रुपये लाखात)
सन 2019-20
निरंक

सन 2020-21
निरंक

खर्च तरतुद (रुपये लाखात)
सन 2019-20
निरंक

सन 2020-21
निरंक

शेरा
प्रस्तुत कार्यालयाकडून दि.02 नोव्हेंबर 2020 रोजी भेट देवून तपासणी करण्यात आलेली आहे.सदर वृध्दाश्रम सन 2020-21 व 2021-22 मध्ये चालु असून सद्यस्थितीत 22 वृध्द पुरुष व 33 वृध्द महीला वृध्दाश्रमात उपस्थित आहेत.

टिप-सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग- शासन निर्णय  दि.06 मार्च2019 अन्वये मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना परिपोषण अनुदान रु.1500/- दरडोई दरमहा मंजूर करण्यात आले आहे.