धनगर  समाजाच्या मुलां-मुलींसाठी वसतिगृह

उद्दिष्ट :

गेली अनेक वर्ष विकासापासुन दुर असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरीता भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या लोकांसाठी राज्यात महसुली विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे

लाभाचे स्वरुप :

  1. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर व उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मोफत निवास,भोजन, शैक्षणिक साहित्य,आरोग्य इ. सोइेसुविधा यक्त निवासाची व्यवस्था.
  2. वसतिगृहातील विद्यार्थ्याना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता, दरमहा रु.900/- (मुलींसाठी स्वच्छता व प्रसाधन भत्ता दरमहा रु. 200/- अतिरिक्त)

 

अटी व शर्ती :

  1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. या वसतिगृहामध्ये इ.11 वी पासून पुढील शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल.
  3. प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या त्या-त्या प्रवर्गातील अर्जदारांना संबंधित प्रवर्गातील राखीव जागेवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.
  4. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागातुन 50 टक्के जागा राखून ठेवण्यात येतील. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव जागांवर गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.
  5. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1.00 लाखापेक्षा कमी असावे.
  6. या वसतिगृहामध्ये इ.11 वी प्रथम वर्ष, पदविका,पदवी प्रमाणपत्र परिक्षा आणि प्रथम वर्ष पदव्युत्तर पदवी यासाठी प्रवेश देण्यात येईल. यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल व गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय विहित टक्केवारीनुसार प्रवेश निर्धारित केले जातील.
  7. विहित टक्केवारीनुसार वसतिगृह प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सदर रिक्त राहणाऱ्या जागी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल.