औद्योगिक सहकारी संस्था
उद्दिष्ट :- सहकाराच्या माध्यमातन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उधेशाने त्या घाटकातील संस्थाना अर्थ सहाय्य देण्यची योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या यंत्रमाग सोसायट्या, निटिंग गारमेंट्स, सुत प्रोसिंग युनिट्स, शेती माल प्रक्रिया साखर कारखाणे रुपांतरीत करणे व तत्सम उधोगांचा समावेश आहे.
स्वरूप:-
सहकारी संस्थाना द्यावयाचा अर्थ्साहाय्यचे सूत्र खालील प्रमाणे आहे..
1 सहकारी संस्थाचा स्वः हिस्सा – 5%
2 सहकारी संस्थाना शासकीय भाग भांडवल – 35%
3 शासकीय दीर्घ मुदतीचे कर्ज- 35%
4 वित्तीय संस्था कडून कर्ज – 25%
अटी व शर्ती:
1 सहकार कायद्याच्या अंतर्गत संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक.
2 संस्थेचे 70% भागधारक हे अनुसूचित जातीचे / नवबौद्ध असावेत.
3 संस्थेने प्रकल्पाच्या 5% स्वः हिस्सा भाग भांडवल जमा करणे आवश्यक आहे.
4 शासनाने या योजनेसाठी विहित केलेल्या 1 ते 32 अटी व पूरक अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.