शासन निर्णय क्र.बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2,दि.6/1/2017
शासन शुध्दीपत्रक्र क्र. बीसीएच-2016प्र.क्र.293/शिक्षण-2,दि.16/11/2017
शासन पुरक पत्र क्र. बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2,दि.02/12/2017
शासन निर्णय क्र.बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2,दि.13/06/2018
उद्दीष्टे :-
राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविदयालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्याथ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुविधेचा जागेची मर्यादा लक्षात घेता लाभ देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठया प्रमाणात विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकांतील विदयार्थ्यीना पूढील शिक्षण घेता यावे म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.
10वी नंतरच्या अभ्यासक्रमांना (11वी,12वी) व 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करणेबाबत “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” राबविण्यास याव्दारे शासन मान्यता देत आहे.
अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणे किंवा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्याकडे उपलब्ध राहणार असल्याने सदर विदयार्थ्यीच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही व तो शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष खालीलप्रमाणे :-
विदयार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
विदयाथी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विदयार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा.
विदयार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या़ व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल.
विद्यार्थ्यांने स्वत्:या आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीकृत/शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या-ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची उत्पन्न वार्षिक मर्यादा त्या-त्या प्रमाणे लागू राहील.
विद्यार्थी स्थानिक नसावा (ज्या महाविद्यालय/शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय/शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालीका/ नगर पालीका/ ग्रामपंचायत / कटक मंडळे येथील रहीवाशी नसावा.)
महानगर पालिकेच्या हद्दीपासुन 05 की.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीसुध्दा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
विद्यार्थी इयत्ता 11वी , 12वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
11 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यास 10 वी मध्ये किमा 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
12 वी मध्ये विदयार्थ्यास किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पूढे पदवी/ पदव्युत्तर शिक्षणाकरीता लाभ घेता येईल.
पदवी, पदवीका, दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास सदर विदयार्थ्यास पुढे लाभ घेण्याकरीता किमान 50 टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/CGPA असणे आवश्यक राहिल.
12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनतर पदव्युत्तर पदवी / पदवीका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा. (संबंधित अभ्यासक्रम शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुज्ञेय असावा.)
विदयार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
या योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. व त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.