सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

 

विविध सामाजिक  पुरस्‍कार योजना

 

  • उद्दिष्‍टे :-
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त्‍ जाती, भटक्‍या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्‍यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या अपंग, कुष्‍ठरोग, पिडीत, दुर्लक्षित या गरजुंची निष्‍ठेने सेवा करुन समाज कल्‍याण क्षेत्रात मौलिक कार्य करणा-या सेवाभावी व्‍यक्‍ती व सामाजिक संस्‍थांचा त्‍यांनी केलेल्‍या कार्याचा यथोचित गौरव व्‍हावा व कामाची दाद द्यावी म्‍हणुन शासनाने विविध पुरस्‍कार देण्‍याची योजना कार्यान्वित केलेली आहे.     
  • पुरस्‍कारांचे नाव, स्‍वरुप व पात्रता
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्‍कार
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त्‍ जाती, भटक्‍या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्‍या कल्‍याणासाठी भरीव काम करणा-या सामाजिक कार्यकर्ता व स्‍वयंसेवी संस्‍था ह्या सदर पुरस्‍कारासाठी पात्र आहेत.
  • पात्रता :- पुरस्‍काराकरीता पुरुषांचे वय-५० वर्षाच्‍या पुढे  व महिलांचे वय ४० वर्षाच्‍या पुढे  असावे
  • संस्‍था ही धर्मादाय कार्यालयामार्फत नोंदणीकृत असावी, संस्‍थेचे मागील तिन वर्षाचे अॅडीट असावे.
  • पुरस्‍काराची रक्‍कम प्रति व्‍यक्‍ती १५०००/- व प्रति संस्‍था २५०००/- आहे.
  • लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कार
  • राज्‍यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना तसेच मातंग समाजातील लोकांच्‍या कल्‍याणासाठी भरीव काम करणा-या स्‍वयंसेवी संस्‍था यांचेसाठी   लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कार योजना सुरु करण्‍यात आलेली आहे.
  • सदर पुरस्‍कार केवळ मातंग समाजातील व्‍यक्‍तींना भेटतो.
  • पात्रता :- पुरस्‍काराकरीता पुरुषांचे वय ५० वर्षाच्‍या पुढे व महिलांचे वय ४० वर्षाच्‍या पुढे असावे
  • संस्‍था ही धर्मादाय कार्यालयामार्फत नोंदणीकृत असावी, संस्‍थेचे मागील तिन वर्षाचे अॅडीट असावे.
  • पुरस्‍काराची रक्‍कम प्रति व्‍यक्‍ती २५०००/- व प्रति संस्‍था ५००००/- आहे.

*   पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्‍कार

१    कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांनी रुढी परंपरे विरुध्‍द व अस्‍पृश्‍यते विरुध्‍द सामाजिक चळवह उभारली.  भूमिहीन शेतमजूर व कामगारासाठी देशात अनेक ठिकाणी सत्‍यागृह केले.  संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीत त्‍यांचा सिंहाचा वाटा होता.  तसेच त्‍यांनी पुरोगामी महाराष्‍ट्र घडविण्‍यामध्‍ये अत्‍यंत मोलाची कामगिरी केली हे कार्य विचारात घेऊन त्‍यांचे नावे पुरस्‍कार देण्‍यात येतो.

२.   पुरस्‍काराची रक्‍कम:- व्‍यक्‍ती व संस्‍था यांना प्रत्‍येकी ५१०००/- चे पारितोषिक देण्‍यात येते.

*   संत रविदास पुरस्‍कार

१.   चर्मकार व अनुसूचित जाती व नवबौध्‍द समाजाच्‍या उध्‍दारासाठी कार्य करणा-या व्‍यक्‍ती/संस्‍थांना संत रविदास पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येते.

२.   पुरस्‍काराची रक्‍कम प्रति व्‍यक्‍ती २१०००/-  प्रति संस्‍था ३०००१/-

*   शाहु, फुले, आंबेडकर पुरस्‍कार

१.   महाराष्‍ट्र राज्‍यात विविध क्षेत्रात काम करणा-या संस्‍थांच्‍या सामाजिक न्‍यायाच्‍या क्षेत्रातील योगदानामुळे महाराष्‍ट्राचे नाव राष्‍ट्रीय व अंतरराष्‍ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्‍य म्‍हणुन घेतले जाते.  अशा सामाजिक न्‍यायाच्‍या क्षेत्रामध्‍ये काम करणा-या संस्‍थांना महाराष्‍ट्रातील सर्वोच्‍च प्रतिष्‍ठेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येते.

२.   पुरस्‍काराची रक्‍कम प्रति संस्‍था १५ लाख रु.

*   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय प्राविण्‍य पुरस्‍कार

१.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय प्राविण्‍य पुरस्‍कार सामाजिक न्‍याय विभागांतर्गत उत्‍कृष्‍ठ शासकीय/ अनुदानित संस्‍थासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक नयाय प्राविण्‍य पुरस्‍कार देण्‍यात येतो.

२.   पुरस्‍काराची रक्‍कम राज्‍य स्‍तरावर प्रथम क्र. १ लाख, द्वितीय क्र. ३ लाख, तृतीय क्र. २ लाख रु.

 

.क्र.

पुरस्काराचे नाव

व्‍यक्‍ती/संस्‍था

पारितोषिक रक्‍कम

गेल्‍या पाच वर्षातील पुरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍ती व संस्‍थांची संख्‍या

   २०१७

    २०१८

२०१९

२०२०

२०२१

1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार

व्‍यक्‍ती/संस्‍था

व्‍यक्‍ती -१५०००/-

संस्‍था – २५०००/-

व्‍यक्‍ती -०३

संस्‍था- निरंक

निरंक

व्‍यक्‍ती – १

संस्‍था – १

निरंक

निरंक

2

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार

व्‍यक्‍ती/संस्‍था

व्‍यक्‍ती -२५०००/-

संस्‍था – ५००००/-

व्‍यक्‍ती – २

संस्‍था- निरंक

निरंक

व्‍यक्‍ती ०४

संस्‍था ३

निरंक

निरंक

3

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार

व्‍यक्‍ती/संस्‍था

व्‍यक्‍ती -५१०००/-

संस्‍था – ५१०००/-

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

4

संत रविदास पुरस्कार

व्‍यक्‍ती/संस्‍था

व्‍यक्‍ती -२१०००/-

संस्‍था – ३०००१/-

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

5

शाहु, आंबेडकर पुरस्कार

संस्‍था

संस्‍था – १५ लाख

निरंक

निरंक

संस्‍था ०२

निरंक

निरंक

6

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार

संस्‍था

प्रथम क्र.- ५ लाख

द्वितीय क्र.-३ लाख

तृतीय क्र.- २ लाख

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक