अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नांव | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत. |
2 | योजनेचा प्रकार | राज्य योजना |
3 | योजनेचा उद्देश | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे राहणीमानात बदल व्हावा, या उद्देशाने सदरची योजना शासन पत्र क्रमांक एसटीएस-2011/प्र.क्र.439/अजाक-1, दिनांक 6 डिसेंबर, 2012 पासुन कार्यान्वीत करण्यांत आली.सदर योजनेंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यांत येते. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनूसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी |
5 | योजनेच्या प्रमुख अटी | सदरची योजना एकूण 1 ते 13 अटी व शर्तींच्या अधिन राहून राबविण्यांत येते त्यापैकी महत्वाच्या तीन अटी खालील प्रमाणे-
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने. |
7 | अर्ज करण्यांची पध्दत | संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य अर्ज करु शकतील. |
8 | योजनेची वर्गवारी | आर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती |