इतर मागास बहुजन कल्‍याण संचनालय विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

 

महात्‍मा बस्‍वेश्‍वर सामाजिक समता शिवा पुरस्‍कार

 

  • शासन निर्णय :-
  • विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण विभाग दिनांक ०८ मार्च २०१९

 

  • उद्दिष्‍टे :-

विरशैव- लिंगायत समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कलात्‍मक व साहित्‍यीक क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-या व्‍यक्‍तीला महात्‍मा बस्‍वेश्‍वर सामाजिक समता शिवा पुरस्‍काराने सन्‍मानित करणे.

 

  • महात्‍मा बस्‍वेश्‍वर सामाजिक समता शिवा पुरस्‍कार या योजनेचे पात्रता व निकष :-
  • विरशैव-लिंगायत समाजाकरीता कमीत कमी दहा वर्ष कलात्‍मक, आध्‍यात्मिक प्रबोधन आणि साहित्‍य क्षेत्रात कार्य करणारे कलावंत असावेत.
  • पुरुषांचे वय कमीत कमी ५० वर्ष किंवा त्‍यापेक्षा जास्‍त असावे व स्‍त्रीयांचे वय कमीतकमी ४० वर्ष किंवा त्‍यापेक्षा जास्‍त असावे.
  • कोणत्‍याही व्‍यक्‍तीस एकापेक्षा अधिक वेळेस पात्र समजता येणार नाही.
  • सदर पुरस्‍कारासाठी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, जि.प.सदस्य) पात्र नसतील.
  • राज्‍यातून एका व्‍यक्‍तीस पुरस्‍कार देण्‍यात येतो.