केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायव सक्षमीकरण मंत्रालयाने सन 2009-10 या वर्षापासून प्रायोगिक तत्वावर प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना लागू केलेली आहे.
सदर योजना अनुसूचित जातीची 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात पाणी पुरवठा, रस्ते, इ. मुलभूत सोईसुविधांची कामे राज्य शासनाच्या इतर योजनांशी मेळ घालून ( Convergence Of The Schemes) मंजूर केली जातात.
या योजनेसोबत राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची निवड झालेल्या गावांमध्ये अंमलबजावणी करुन सदर गावांचा सर्वांगिण विकास करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने अंतर्गत लातूर जिल्हयातील मौजे हंद्राळ,मौजे जोतवाडी ता. निलंगा तथा मौजे कासराळ ता उदगीर जि. लातूर या गावांची 50 टक्के पेक्षा जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असल्यामुळे सदर गावांची निवड केंद्रशासनाने केली आहे.