सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण योजना
शासन निर्णय :-
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागृ शासन निर्णय क्र. इबीसी-२००५/प्र.क्र.७८/ मावक-२ दिनांक ०८ फेब्रुवारी २००६
उद्दिष्टे :-
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण अभाव असल्यामुळे त्यांना सैन्य व पोलिस भरतीची संधी उपलब्ध् करुन देण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.
अटी व शर्ती :-
उमेदवार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा.
उमेदवारांची उंची, छाती इ. सैन्य व पोलिस भरतीसाठी विहीत केलेली पात्रता असावी.