नागरिकांची सनद

 

प्रास्ताविक:

 

राज्यातील अनुसूचित जाती,विमुक्त जाती भटक्या जमाती,इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग यांच्या आर्थिक शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक उन्नतीसाठी विविध उपक्रम/योजना कार्यान्वित करण्यासाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.

भारतीय राज्य घटनेच्या भाग-चार मार्गदर्शक तत्वे या मथळया खाली कलम 46 अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हास्तरीय सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण यांच्या कार्यालया मार्फत विविध योजना राबविण्यात येतात

.           समाजकल्याण कार्यालयाची संरचना पुढील प्रमाणे आहे.

                                                            सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाची संरचना

 

                                                                               सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, लातूर

                                                             |                                                                    |

                        समाज कल्याण अधिकारी (गट-ब)                                  विशेष अधिकारी ,शासकीय निवासी शाळा (समाजकल्याण सेवा)

                                                                                        |                                                                        

कार्यालय अधिक्षक  

          |   

  वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक   

                 |  

सहाय्यक लेखाधिकारी                                      

                                                                                             |

                                                                              समाजकल्याण निरीक्षक (5)

                                                                                         |

वरिष्ठ लिपीक (2)

         |

   लघुटंकलेखक   

           |

                                                                               कनिष्ठ लिपीक (4)

                                                                                          |

                                                                                   वाहनचालक

                                                                                         |

                                                                                संगणक ऑपरेटर(ठोक वेतनावर)

                                                                                         |

                                                                                        शिपाई (2)

 

 

                                        माहितीचा अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत सक्षम असणारे जन माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी

                                         

                                                               कार्यालयाचे नांव: सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, लातूर

 

अ.क्र.

अधिका-यांचे नांव

पदनाम कार्यालयाचे नांव

माहिती अधिकार अंतर्गत पदनाम

दुरध्वनी क्रमांक

 

1

श्री. अविनाश देवसटवार

प्रादेशिक उपायुक्त,समाजकल्याण विभाग,लातूर, शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

 

अपिलीय अधिकारी

02382-255378

2

श्री. शिवकांत चिकुर्ते

सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण,लातूर

 

 

जन माहिती अधिकारी

02382-258485

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                                                नागरिकांची सनद (CITIZEN CHARTER)  

                                                  कार्यालय: सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण,लातूर     

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

1

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,लातूर

शाखा:

समाजकल्याण निरीक्षक

अनु.जातीच्या आणि नवबौध्द उमेदवारांना सैनिक व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणे

(कालावधी तीन महिने) गणवेश,निवास व भोजन इ.

1.उमेदवार महाराष्ट्रातील अ.जा व नवबौध्द घटकातील असावा

2.उमेदवार 18 ते 25 वयोगटातील असावा

3.उमेदवारांची उंची पुरुष 165 सें.मी.व महिला 155 सें.मी.पुरुष छाती 84 सें.मी (फुगवुन)

4.शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास जातीचे प्रमाणपत्र व रहिवासी दाखला

5.सेवायोजन कार्यालया अंंतर्गत नाव नोंदणी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक

6.उमेदवार शारिरिकदृष्टया निरोगी व सक्षम असावा.

संबंधीत सैनिक व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी संस्था

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

लातूर

शाखा:समाज कल्याण निरीक्षक

30 दिवस

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

2

शाखा

समाजकल्याण निरीक्षक

मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण

अनु.जाती/विजाभज इमाव व विमाप्र विदयार्थ्यांना मोटार चालक व वाहक प्रशिक्षण हलके मो.वाहनचालक-40 दिवस रु.3520/- अवजड मो.वा.चालक 40 दिवस रु.4100) वाहक कंडक्टर 8 दिवस रु.1465

1.वयोमर्यादा 18 च्या पुढे,शारिरिक पात्रता व शैक्षणिक पात्रता

2.जातीचा दाखला आणि फोटो

3.लाभार्थीचा जन्म तारखेचा दाखला

संबंधीत मोटार वाहन प्रशिक्षण संस्था

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

लातूर

शाखा: समाज कल्याण निरीक्षक

30 दिवस

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

 

 

 

 

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

3

शाखा सहकार

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ  लिपीक/ कनिष्ठ लिपीक

अनुसूचित जाती व नवबौध्द लोकांसाठी घरकुल योजना (नागरी)

लाभार्थ्यास स्वत:च्या 269 चौ. फुट असते त्या जागेवर अथवा कच्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांंधुन देण्याची योजना

1.सक्षम प्राधिका-याने दिलेला अर्जदाराचा जातीचा दाखला

2.उत्पन्नाचा दाखला

3.रेशनकार्ड

4.अर्जदाराचा जागेचा स्वमालकीचा 7/12 चा उतारा (269 चौ. फुट असणे आवश्यक नमुना  न-08)

5.मालमत्ता नोंदणी पत्र

6.विद्युत देयक

7.मतदार ओळखपत्र

8.दारिद्रय रेषेखालील कार्ड

9. जागेचा फोटो       

आयुक्त,महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपालिका

सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर

शाखा:विघयो

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

महानगर पालिका/नगरपालिका प्रशासन त्यांचेकडील यादीनुसार बीपीएल लाभ धारकांना लाभ देणे सुरु आहे.

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

4

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ  लिपीक/ कनिष्ठ लिपीक

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन शेतमजुरांना चार एकर कोरडवाहू शेतजमीन किंवा दोन एकर ओलीता खालील शेतजमीन

1.दारिद्रय रेषेच्या कार्डची छायाप्रत,

2.वयासंबंधी पुरावा,

3.भमिहिन असल्याचा पुरावा रहिवाशी पुरावा

4.जातीचा दाखला

5.रहिवाशी दाखला

6. रॅशनकार्ड

7.उत्पनाचा दाखला (तहसिलदारयांचे)

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

लातूर

शाखा:विघयो

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

प्राप्त जमिन खरेदी केल्यानंतर लॉटरी पध्दतीने वाटप केल्या जाते

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

5

शाखा (विघयो)

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ  लिपीक/ कनिष्ठ लिपीक

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना

अनु.जाती लाभार्थीसाठी लोखंंडी पत्र्याचा स्टॉल व गटई साहित्य खरेदीसाठी 500/- रुपये अनुदान दिल्या जाते

1.महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला

2.अनुसूचित जातीचा दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला (ग्रामीण भागात रु.40000 व शहरी भागात रु.50000)

3.वया संबंधीचा दाखला / टी.सी.

4.वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे 60 वर्षापेक्षा जास्त नसावे .

5. जातीचा दाखल

व्यवस्थापक,संत रोहीदास चर्मोद्योग विकास महामंडळ

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर

शाखा:विघयो

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येते.

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

6

शाखा (विघयो)

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ  लिपीक/ कनिष्ठ लिपीक

अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थाना अर्थसहाय्य

अनुसूचित जातीच्या औद्योगीक सहकारी संस्थाना प्रकल्प किंमतीच्या 35% शासकीय भागभांडवल व 35% दीर्घ मुदतीचे कर्ज शासनस्तरावरुन मंजुर करण्यात येते.

1.अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत संस्था अर्ज करण्यास पात्र ठरतात. प्रकल्पाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अनुसूचित जातीचा असावा.तसेच कार्यकारीणीवरील 11 सदस्यापैकी 1 अमागासवर्गीय व उर्वरीत सदस्य अनुसूचित जातीचे असावेत.2.संस्थेचे भागधारक 70% अनुसूचित जातीचे असावेत.तसेच प्रकल्प सुरु झाल्यानंतर त्यातील 70% कर्मचारीवर्ग अनुसूचित जातीचा असावा.3.सहकारी संस्थेकडे प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्प अहवालात नमुद केल्याप्रमाणे आवश्यक तेवढी जागा असली पाहीजे व त्यावर कोणताही बोजा नसले बाबत सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र असले पाहीजे तसेच आवश्यक तेथे बिगर शेती परवाना आवश्यक आहे.4.जमीन संस्थेच्या नावे असल्याचा पुरावा म्हणुन संस्थेच्या नावाचा सातबारा आवश्यक आहे.

सहाय्यक आयुक्त यांचे मार्फत (शाखा विघयो) प्रस्ताव प्रादेशिक उपायुक्त यांचेकडे सादर केला जातो त्यांचेकडून मा.आयुक्त समाज कल्याण यांचे मार्फत शासनाकडे सादर केला जातो.

 

 

 

 

 

 

 

 

 

परिपूर्ण प्रस्ताव

30 दिवसात प्रादेशिक उपायुक्त कार्यालयास सादर केला जातो.  प्रस्ताव मंजुरीचे अधिकार शासन स्तरावर त्यासाठी निश्चीत कालावधी ठरलेला नाही.

मा.सचिव,सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय मुंबई-32

7

शाखा (विघयो)

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ  लिपीक/ कनिष्ठ लिपीक

अनुूसूचित जातीच्या सहकारी सुतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजुर करणे योजना

अनुसूचित जातीच्या सहकारी सुतगिरण्यांना शासन स्तरावरुन दिर्घ मुदत कर्ज मंजुर करण्यात येते.

1.मागासवर्गीयांच्या सहकारी सुतगिरण्यांना कमीत कमी 80लाखापर्यंत सभासद भागभांडवल गोळा केल्यास कर्जा करीता पात्र समजण्यात यावे.

2.सहकारी सुत गिरण्यांनी सादर केलेला प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य सहकारी सुतगिरणी महासंघ यांचे मार्फत तयार करुन घ्यावा.

3.सुतगिरणीचा अध्यक्ष अनुसूचित जातीचा असावा.

4.सुत गिरणीच्या संचालक मंडळावर 90% सदस्य अनुसूचित जातीचे व उर्वरीत 10% इतर सभासद असावेत

5.संस्थेची जमीन संस्थेच्या नावे असल्याचा पुरावा म्हणुन संस्थेच्या नावाचा सातबारा आवश्यक आहे.

6. संस्थेच्या खरेदी केलेल्या जमिनीवर कोणताही बोजा नसले बाबत सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र असले पाहीजे तसेच आवश्यक तेथे बिगर शेती परवाना आवश्यक आहे.

सहाय्यक आयुक्त यांचे मार्फत (शाखा विघयो) प्रस्ताव प्रादेशिक उपायुक्त यांचेकडे सादर केला जातो .त्यांचेकडून मा.आयुक्त समाज कल्याण यांचे मार्फत शासनाकडे सादर केला जातो.

परिपूर्ण प्रस्ताव

30 दिवसात प्रादेशिक उपायुक्त कार्यालयास सादर केला जातो.  प्रस्ताव मंजुरीचे अधिकार शासन स्तरावर त्यासाठी निश्चीत कालावधी ठरलेला नाही.

मा.सचिव,सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय मुंबई-32

8

शाखा (विघयो)

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ  लिपीक/ कनिष्ठ लिपीक

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90% अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेंटर व ट्रेलर यांचा पुरवठा केल्या जातो

1.सदर स्वयंयसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.

2.मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3.50लाख इतकी असून स्वयंसहाय्यता बचतगटांनी सदर कमाल मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्या नंतर 90% (कमाल रुपये 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय आहे.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

 (शाखा विघयो)

जाहीर निवेदन प्रसिध्दीस देऊन स्वयंसहाय्यता बचतगटांचे अर्ज प्राप्त करुन घेतले जातात व छाननी अंती पात्र अर्जातुन उदीष्टानुसार लाभार्थीचीनिवड करण्यातयेऊन मिनीट्रॅक्टरवाटप केले जाते. (90 दिवस)

 

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

 

 

 

 

9

शाखा (विघयो)

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ  लिपीक/ कनिष्ठ लिपीक

अनुसूचित जाती उपयोजना

अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत शासनाच्या विविध विभागा मार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीच्या योजना राबविल्या जातात.

राज्याच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतुद करण्यात येते.अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत जिल्हयातील विविध अंमलबजावणी अधिका-यां मार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी वैयक्तीक लाभाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीच्या योजना राबविल्या जातात.

जिल्हास्तरावरील शासनाच्या  विविध विभागांचे सर्व अंमल बजावणी अधिकारी

सनियंत्रण:सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण लातूर

विविध विभागा मार्फत राबविण्यात येणा-या योजनांच्या अंमलबजावणी विषयी मा.जिल्हाधिकारी यांंचे अध्यक्षतेखाली वेळोवेळी आढावा घेतला जातो.

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

10

शाखा

नागरीहक्क संरक्षण

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक)

अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व नाहसं कायदा 1995 अंतर्गत दाखल गुन्हयातील अत्याचार पिडीतांना अर्थसहाय्य मंजुर करणे

सदर कायदयाखाली दाखल गुन्हयातील अत्याचार पिडीतांना शासन निर्णय दिनांक.21 ऑगस्ट 2013 मधील तरतुदी प्रमाणे गुन्हयाच्या स्वरुपानुसार अर्थसहाय्य मंजुर करण्यात येते

1.जातीचा दाखला

2.एफ.आय.आर ची प्रत

3.रहिवाशी दाखला

4.खून,बलात्कार,शारिरिक इजा या सारख्या प्रकरणात वैद्यकीय दाखला

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

लातूर

नागरी हक्क संरक्षण

समाज कल्याण निरीक्षक/ वरिष्ठ लिपीक

सदर कायदयाखाली दाखल झालेला गुन्हा न्यायप्रविष्ट  झाल्यानंतर पोलीस विभागाकडून आवश्यक असणारी कागदपत्रे प्राप्त होताच गुन्हयाच्या स्वरुपानुसार मा.जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने अर्थसहाय्य मंजुर केले जाते. खुन,बलात्कार अशा गंभीर प्रकरणात तातडीने मंजुर केले जाते.

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

 

 

 

 

 

11

शाखा

नागरीहक्क संरक्षण

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक)

कन्यादान योजना

1.सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणा-यामागासवर्गीय (अनु.जाती/विजाभज) दांंपत्यांना देण्यात येणारे अनुदान रुपये 20,000/- इतकी रक्कम वधूचे वडील,आई किंवा पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशाद्वारे (क्रॉस चेकने) लग्नाच्या दिवशी देण्यात येते.2.सामुहिक विवाह सोहळा आयोजित

1.प्रतिज्ञापत्र

2.शाळा सोडल्याचा दाखला

3.रहिवासी प्रमाणपत्र

4.जातीचा दाखला

5.विवाह नोंदणी प्रमाणपत्र (तीन महिन्याचे आत सादर करणे आवश्यक आहे.)

6.प्रपत्र  ब व क

सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर

नागरी हक्क संरक्षण

समाज कल्याण निरीक्षक/ वरिष्ठ लिपीक

कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाहा पूर्वी 15 दिवस आधी सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालयाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.सामुहिक विवाहाचे आयोजन संस्थे मार्फत केले जाते त्या दिवशी

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

 

 

 

 

 

 

करणा-या स्वयंसेवी संस्थांना प्रति पात्र जोडपे रुपये 4,000/-प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.यासाठी तीन महिन्यांच्या आत विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अर्थसहाय्य देण्यात येते.

 

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

12

शाखा

नागरीहक्क संरक्षण

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक)

नागरी हक्क संरक्षण अंमलबजावणी यंत्रणाअस्पृश्यता निर्मुलनार्थ ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा स्तरावर अस्पृश्यता निर्मुलनार्थ शिबीरे, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा यांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते

तालुका स्तरावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर

नागरी हक्क संरक्षण

समाज कल्याण निरीक्षक/ वरिष्ठ लिपीक

 

तालुका स्तरावर अस्पृश्यता निर्मुलनार्थ ग्रामसेवक तलाठी पंचायत समिती सदस्य इ.साठी गटविकास अधिकारी यांचे स्तरावर शिबीराचे आयोजन करण्यातयेते.जिल्हास्तरावर अस्पृश्यता निर्मुलनार्थ निबंध स्पर्धा/वक्तृत्व स्पर्धा आयोजन केले जाते.

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

13

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/कनिष्ठ लिपीक)

अनुसूचित जाती/ विजाभज/ विमाप्र/इमाव विदयार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती

वसतिगृहात राहणा-या/वसतिगृहा बाहेर राहणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या वर्गीकरणा नुसार शिष्यवृत्ती मंजुर केली जाते.

1.जातीचा दाखला

2.सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला (अनु.जाती साठी रुपये दोन लाख पन्नास हजार व विजाभज/विमाप्र/इमाव साठी एक लाख पेक्षा जास्त नसावे.)

3.महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला

4.शैक्षणिक पात्रता इ.10 वी पास व पुढील शिक्षण चालू असावे

संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य

सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर

शाखा:भासशि

 

विदयार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत

90 दिवस (1 आक्टोबर ते.31 डिसेंबर)

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

14

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/कनिष्ठ लिपीक)

अनुसूचित जाती/ विजाभज/ विमाप्र/इमाव विदयार्थ्यांना विदयार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी मंजुर करणेविद्यापीठ किंवा शिक्षण शुल्क समितीने निर्धारीत केलेल्या दराने महाविद्यालयांना मागासवर्गीय विदयार्थ्यांचे शिक्षण शुल्क,परिषा शुल्क व इतर शुल्क अदा केले जाते.

1.जातीचा दाखला

2.अनु.जाती साठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.विजाभज/इमाव व विमाप्र साठी 8.00 लाख नॉन क्रीमीलेअर मर्यादेत असावे.

3.महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला

4.शैक्षणिक पात्रता इ.10 वी पास व पुढील शिक्षण चालू असावे.

संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य

सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर

शाखा:भासशि

 

विदयार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत

90 दिवस (1 आक्टोबर ते.31 डिसेंबर)

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

15

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/कनिष्ठ लिपीक)

वैद्यकीय,तंत्रनिकेतन,कृषी,पशुवैद्यकीय व अभियांत्रिकी व्यावसायिक पाठयक्रम असणा-या महाविद्यालयात शिकणा-या अनु.जातीच्या विदयार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना

महाविद्यालयीन अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना 2 विदयार्थ्यामागे एक पुस्तकसंच

1.भारत सरकार शिष्यवृत्ती धारक अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांची यादी

2.मागील घेतलेल्या ग्रंंथपेढीचे उपयोगीता प्रमाणपत्र व विकत घेतलेल्या पुस्तकांची यादी

3.खरेदी करावयाच्या पुसतकांची यादी

संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य

सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर

शाखा:भासशि

 

90 दिवस (1 आक्टोबर ते.31 डिसेंबर)

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

16

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/कनिष्ठ लिपीक)

सैनिकी शाळेतील अनुसूचित जाती/जमाती/विजाभज/विमाप्र च्या विदयार्थ्याना निर्वाहभत्ता

सैनिकी शाळेतील अनुसूचित जाती/जमाती/विजाभज/ विमाप्र मधील प्रवेशीत विदयार्थ्यांना निवास, भोजन, पाठयपुस्तक तसेच शिक्षण शुल्क व इतर फीसाठी निर्वाहभत्ता सैनिकी शाळेस देण्यात येतो.

 

1.सक्षम अधिका-यांनी दिलेला जातीचा दाखला

2.सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला

(अनु.जाती साठी रुपये दोन लाख व विजाभज/विमाप्र/इमाव साठी एक लाख पेक्षा जास्त नसावे.)

3.शैक्षणिक पात्रता इ.5 वी ते 10 वी  व 11 वी 12 वी मध्ये शिकत असलेला असावा. 

4.महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला

संबंधीत सैनिकी शाळेचे मुख्याध्यापक

सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर

शाखा:भासशि

विदयार्थ्यांनी ऑफलाईन  अर्ज भरावयाचे आहेत

90 दिवस (1 आक्टोबर ते.31 डिसेंबर)

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

17

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/कनिष्ठ लिपीक)

व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतिगृहातील अनु.जाती/विजाभज/विमाप्र विदयार्थ्यांना निर्वाहभत्ता व विद्यावेतन

अनुसूचित जाती/विजाभज/विमाप्र प्रवेशीत विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती व्यतिरिक्त अभ्यासक्रमा नुसार ठरावीक दराने निर्वाहभत्ता/विदयावेतन दिले जाते.

1 सक्षम अधिका-यांनी दिलेला जातीचा दाखला

2.सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला

(अनु.जाती साठी रुपये दोन लाख पन्नास हजार व विजाभज/विमाप्र/इमाव साठी एक लाख पेक्षा जास्त नसावे.)शिष्यवृत्तीधारक विदयार्थी असावा

3.महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला

4.शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्याचे प्रमाणपत्र व इतर वसतिगृहात राहात असल्याचे पुरावे.

संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य

सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर

शाखा:भासशि

 

विदयार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत

90 दिवस (1 आक्टोबर ते.31 डिसेंबर)

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

18

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/कनिष्ठ लिपीक)

अनु.जाती/विजाभज/विमाप्र विदयार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

इयत्ता 10 वी च्या परिक्षेत 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवुन इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती/विजाभज/विमाप्र विदयार्थ्यांना सदर योजनेचा लाभ दिला जातो

1.इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका झेरॉक्स 75 %पेक्षा जास्त गुण मिळविलले असावेत

2.सक्षम अधिका-यांनी दिलेला जातीचा दाखला

3.प्रवेश घेतल्याची पावती

 

 

 

 

संबंधीत शाळा/महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य

सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर

शाखा:भासशि

विदयार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत

प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 120 दिवस

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

19

 

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/ कनिष्ठ लिपीक)

इयत्ता 10 वी व 12 वी च्या पीरक्षेत सर्वसाधारण विदयार्थ्यामधुन प्रथम आलेल्या अनुसूचित जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विदयार्थ्यास पुरस्कार

राज्यात प्रथम,प्रत्येक बोर्डामधून,प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेला,जिल्हयात प्रथम,तालुक्यामध्ये प्रथम,माध्यमीक विदयालय व कनिष्ठ महाविद्यालया मधून प्रथम

1.इयत्ता 10 वी 12 वी ची गुणपत्रिकेची झेरॉक्स

2.सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला

माध्यमीक व उच्च माध्यमीक परिक्षा मंडळातील गुणवत्ता धारक विदयार्थ्यांची यादी प्राप्त झाल्या नंतर सहाय्यक आयुक्त

समाज कल्याण

लातूर यांचे मार्फत कार्यवाही केली जाते.

शाखा:भासशि

ऑफलाईन

 

 

 

 

 

 

 

 

प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 120 दिवस

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

20

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/ कनिष्ठ लिपीक)

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विजाभज/ विमाप्र प्रवर्गाच्या प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन योजना

सदर योजनेअंतर्गत विजाभज/विमाप्र प्रवर्गाच्या मुलामुलींना तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणुन प्रशिक्षणार्थीस दरमहा रुपये 100 प्रमाणे 10 महिन्याला रुपये 1000 विद्यावेतन दिले जाते.

1.प्रशिक्षणार्थी हा विजाभज/विमाप्र प्रवर्गातील असावा.

2.शासकीय/शासनमान्य तांत्रिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित असावा व नियमितपणे हजर असावा

3.उत्पन्न मर्यादा रुपये 65290/- इतकी आहे.

संबंधीत औद्योगीक प्रशिक्षण  संस्थेचे प्राचार्य

शासकीय/शासनमान्य तांंत्रिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यावेतन मंजुर केले जाते.

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

21

 

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/ कनिष्ठ लिपीक)

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थांमधुन अनु.जाती/विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे (मागेल त्याला व्यावसायिक प्रशिक्षण)

सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती /विजाभज व विमाप्र प्रवर्गामधील बेरोजगार उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण  संंंस्थामध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाते.तसेच प्रशिक्षणार्थ्यांस टूल किट आणि रु.100 दरमहा विद्यावेतन देण्यात येते.

 

 

 

 

1.उमेदवार अनुसूचित जातीचा/नवबौध्द घटकातील असावा.

2.शैक्षणिक पात्रता किमान 4 थी पास

संबंधीत औद्योगीक प्रशिक्षण  संस्थेचे प्राचार्य

प्रशिक्षण कालावधी 1 आठवडा ते.दोन महिने असा आहे.

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

22

 

शाखा:भारत सरकार शिष्यवृत्ती

(समाज कल्याण निरीक्षक/वरिष्ठ लिपीक/ कनिष्ठ लिपीक)

समाजकल्याण संस्थाना अनुदान (समाज कार्य महाविद्यालये)सदर योजने अंतर्गत स्वयंसेवी संस्थे मार्फत चालविल्या जाणा-या शासनमान्य विद्यापीठाशी संंंलग्न असणा-या समाजकार्य विषयाच्या पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणा-या महाविद्यालयांना अनुदान देण्यात येते.तथापि लातूर येथील समाजकार्य महाविद्यालय हे विनाअनुदानीत आहे .सदर महाविद्यालयात समाजकार्य विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात.

सदर योजने अंतर्गत स्वयंसेवी संस्थे मार्फत चालविल्या जाणा-या शासनमान्य विद्यापीठाशी संंंंलग्न असणा-या समाजकार्य विषयाच्या पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणा-या महाविद्यालयांना अनुदान देण्यात येते. तथापि लातूर येथील समाजकार्य महाविद्यालय हे विनाअनुदानीत आहे..सदर महाविद्यालयात समाजकार्य विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात.

प्राचार्य

समाजकार्य महाविद्यालय

लातूर

 

सदर महाविद्यालयात समाजकार्य विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात.

सहाय्यक आयुक्त,

समाज कल्याण लातूर

23

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना समाज कल्याण निरिक्षक

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणुन भेाजन निवास व इतर शैक्षणीक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलबध करुन घेण्यासाठी

लाभार्थी हा लातूर जिल्हयाच्या ठिकानाबाहेर ग्रामिण भागात राहणारा परंतू लातूर जिल्हयाच्या ठिकाणी शिक्षण घेणारा असावा

1.   विद्यार्थी अनु. जाती प्रवर्गातील असावा

2.   स्थानिक रहिवाशी नसावा

3.   विद्यार्थ्यांना 50% गुण असणे अनिवार्य आहे

4.   विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसावा

5.   शिकत असलेले महाविद्यालय जिल्हयाच्या ठिकाणी असावे

6.   विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावे

7.   विद्यार्थी दिव्यांग असल्यास गुणांची मर्यादा 40% इतकी रहाील व जाहिरातीतील नमूद इतर कागदपत्रे

 

 

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  लातूर शाखा स्वाधार योजना

विद्यार्थ्यांना या कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जाची छाननी करुन      पात्र विद्यार्थ्यांना त्या त्या शैक्षणीक वर्षात पहिला व दुसरा हप्ता असा दोन वेळेस लाभ दिला जातो

प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

 शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

24

शाखा:तांडा वस्ती

 समाजकल्याण निरीक्षक

तांडा वस्ती सुधार योजना

विजाभज व विमाप्र प्रवर्गातील लोकांच्या तांडया व वस्तीमध्ये मुलभुत सोयीसाठी शासन निर्णयात नमूद लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मंजूर केला जातो.

संबंधीत ग्रामपचायंत व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडून प्राप्त आराखडयानुसार गटविकास अधिकारी यांचे मार्फत तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रस्ताव मंजुरीस्तव सादर केले जातात.

संबंधीत ग्रामसेवक, गटविकास अधिकारी

जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प. यांचेकडून प्रस्ताव प्राप्त

झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचें मार्फत जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवला जातो.

सहाय्यक आयुक्त यांचेकडून ü तांडा सुधार योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खालील समितीपुढे प्रस्ताव सादर करुन समितीच्या मंजुरी नुसार ग्राम पंचायतीस अनुदान मंंजुर केल्या जाते

1)जिल्हाधिकारी ,लातूर

2) प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग,

शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

25

शाखा:यशवंतराव मुक्त वसाहत योजना

(समाजकल्याण निरीक्षक)

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील गावोगावी भटकंंती करुन उपजिवीका करणारे     झोपडी/कच्या घरात किंवा पालात राहणारे  प्रत्येक लाभार्थी कुटुंंंबाना पाच गुंंंठे जमिन उपलब्ध करुन देऊन सदर योजनेअंतर्गत 269 चौरसफुट घरे बांंधुन देण्यात येणार आहेत.घराच्या बांधकामासाठी कमाल खर्चाची मर्यादा 70 हजार रुपये इतकी असेल.

संबंधीत ग्रामपचायंती कडून प्राप्त झालेल्या आराखडयानुसार गटविकास अधिकारी यांचे मार्फत प्राप्त झालेला प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी लातूर यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती समोर सादर करुन कार्यवाही केलीजाईल.

संबंधीत ग्रामसेवक, गटविकास अधिकारी

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, लातूर

गटविकास अधिकारी यांचे मार्फत प्राप्त          झालेला प्रस्ताव  मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खालील जिल्हास्तरीय समिती समोर मंजुरीस्तव सादर केल्या जाईल

1)मा.जिल्हाधिकारी,लातूर

2) प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग, शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

 

 

 

 

 

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

26

गृहनिर्माण (समाज कल्याण यनिरीक्षक

विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या लोकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तीय सहाय्य:सदर योजनेअंतर्गत विजाभज/ विमाप्र मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेस जमीन अनुदान मंजुर केले जाते तसेच उत्पन्न मर्यादानुसार घराच्या बांधकाम खर्चाची मर्यादा रु.1,00,000/-गृहीत धरुन खर्चाच्या 30% शासकीय अनुदान,20% लाभार्थी हिस्सा व 50% बॅकेचे कर्ज  अनुज्ञेय होते.

1.विजाभज लाभधारकांची मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संंस्था नोंदणीकृत असावी व कमीत कमी 11 सभासद असावेत

2.लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न अट पुढील प्रमाणे

अ) आर्थिकदृष्टया दुर्बल गट रु.25000

ब) अल्प उत्पन्न गट  रु.50000 पर्यंत

क) मध्यम उत्पन्न गट 50 ते 75 हजार पर्यंंत

ड) उच्च उत्पन्न गट रुपये 75000/- पेक्षा अधिक

समाज कल्याण निरीक्षक

गृहनिर्माण शाखा

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, लातूर

संस्थेचा परिपूर्ण  प्रस्ताव प्राप्त झाल्या नंतर 30 दिवसात मंजुरी साठी मा.प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांचेकडे सादर केला जातो

 प्रादेशिक उपायुक्त,

समाज कल्याण विभाग, शिवनेरी गेट समोर, सामाजिक न्याय भवन,लातूर.

 

 

27

शाखा:आश्रमशाळा

(समाज कल्याण निरीक्षक)

स्वयंसेवी संस्थेमार्फत विजाभज/विमाप्र मुला-मुलींसाठी चालविण्यात येणा-या प्राथमीक/ माध्यमीक निवासी आश्रम शाळांना अनुदान:सदर योजनेअंतर्गत जिल्हयातील 15 प्राथमीक आश्रमशाळा, 14 माध्यमीक आश्रमशाळा व 10 कनिष्ठ महाविद्यालयातील विजाभज च्या 4280 इतक्या निवासी विदयार्थ्यांची शिक्षणांची, भोजन,निवासाची सोय केली जाऊन शैक्षणिकसाहित्य,गणवेश,आंथरुण पांघरुन इ.सोयीसुविधाउपलब्धकरुनदिल्या जातात

 

1.विदयार्थी विजाभज/विमाप्र प्रवर्गातील असावा. जातीचा दाखला

2.विदयार्थ्यांचा जन्म तारखेचा पुरावा

3.महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे विदयार्थ्याच्या पालकाचा दाखला

संबंधीत प्राथमीक/माध्यमीक/ उच्च माध्यमीक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक

प्रत्येक मान्यता प्राप्त आश्रमशाळेत जागेच्या उपलब्धते नुसार विजाभजच्या विदयार्थ्यांना व प्रत्येक वर्गात पाच या प्रमाणात अनु.जाती जमातीच्या विदयार्थ्यांना शाळा सुरु झाल्या नंतर त्वरित प्रवेश मिळेल

 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर

 

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

(शाखा)

जनतेस देण्यात येणा-या सेवा /योजनेचे नांव

 

त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिका-याचे नांव नमूद कराव)

सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित/सर्वसाधारण)

सेवा पुरविली न गेल्यास तक्रार (असल्यास) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता

28

शाखा:शासकीय वसतिगृहे

(समाजकल्याण निरीक्षक)

मागासवर्गीय विदयार्थी/विदयार्थीनींसाठी शासकीय वसतिगृहे

शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी/ विदयार्थीनींना गुणवत्तेनुसार व आरक्षणाच्या टक्केवारीनुसार प्रवेश दिल्या जातो वसतिगृहात विनामुल्य भोजन व निवासाच्या व्यवस्थेबरोबरच शालेय विदयार्थ्यांना गणवेश,व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिल्या जाते.

1.इयत्ता 8 वी व त्यापुढे शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विदयार्थी/विदयार्थीनासंबंधीत शासकीयवसतिगृहाचे गृहपाल यांचेकडे प्रवेशासाठी अर्ज करता येतो.2.उत्पन्राचे प्रमाणपत्र प्रवेशीत विदयार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अनु.जाती साठी दोन लक्ष व विजाभज/इमाव साठी 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे 3.जातीचा दाखला 4.गुणपत्रक 5.शाळासोडल्याचादाखला6.बोनाफाईड प्रमाणपत्र

गृहपाल,मुलांचे / मुलींचे शासकीय वसतिगृह लातूर, औसा, निलंगा, देवणी, उदगीर, चाकूर, अहमदपूर, जळकोट, रेणापूर

विदयार्थ्यानी 30 जून पर्यंत किंवा परिक्षेचा निकाल लागल्या पासून 15 दिवसाचे आत संबंधीत वसतिगृह गृहपाल यांचेकडे अर्ज करावयाचे आहेत.

30 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रवेश अंतिम केले जातात.

सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण लातूर

29

शासकीय निवासी शाळा

(समाजकल्याण निरीक्षक)

अनु.जातीच्या मुला/मुलींसाठी शासकीय निवासी शाळा

इयत्ता 5 वी पासून दहावी पर्यंत शिक्षण घेणा-या अनुसूचित जातीच्या मुला/मुलींसाठी निवासी शाळेत प्रत्येक वर्गात 40 या प्रमाणे प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत विनामुल्य भोजन व निवासाच्या व्यवस्थेबरोबरच शालेय विदयार्थ्यांना गणवेश,व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिल्या जाते.

1.इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विदयार्थी/विदयार्थीना संबंधीत शासकीय निवासी शाळांचे मुख्याध्यापक यांचेकडे प्रवेशासाठी अर्ज करता येतो.

2.सक्षम अधिका-यांचे उत्पन्राचे प्रमाणपत्र

प्रवेशीत विदयार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अनु.जाती साठी दोन लक्ष व विजाभज/इमाव साठी 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे 3.जातीचा दाखला 4.शाळा सोडल्याचा दाखला

5..गुणपत्रक

मुख्याध्यापक मुलांचे शासकीय निवासी शाळा जाऊ ता.निलंगा, बावची ता. रेणापूर, मरशवणी ता. अहमदपूर, एम.आय.डी.सी. लातूर, तोंडार ता. उदगीर

शासकीय निवासी शाळा शाखा

माहे जुन मध्ये शाळा सुरु होण्यापूर्वी विदयार्थ्यांंनी संबंधीत निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण लातूर

 

 

 

                   

                                            सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण,

                                                                  लातूर.